Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 144 कलम लागू

सातारा जिल्ह्यातील सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी होवून परिणामी कोरोना विषाणूचा संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने तसेच नागरिक-नागरिकांमध्ये आणि नागरिक व लसीकरण केंद्रावर सेवा देणारे कर्मचारी यांचेमध्ये वाद-विवाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.

अंबादास दानवे यांनी केज तालुक्यात नुकसान झालेल्या फळबाग व पिकाची केली पाहणी
अतिरिक्त ऑक्सीजन निर्मितीसाठी सातारच्या के नॉयट्रोक्सीजन कंपनीला 14 तासांत वाढीव वीजभार : ऊर्जामंत्री डॉ. राऊत
प्रदीप शिंदे यांनी स्वरक्ताने साकारले स्वा.सावरकरांचे रेखाचित्र 

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी होवून परिणामी कोरोना विषाणूचा संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने तसेच नागरिक-नागरिकांमध्ये आणि नागरिक व लसीकरण केंद्रावर सेवा देणारे कर्मचारी यांचेमध्ये वाद-विवाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व कोरोना लसीकरण केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदी  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केले आहेत.

या आदेशानुसार सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मास्क परीधान करून रांगेत उभे राहुन प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान 3 फुटांचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधन राहील. तसेच अनावश्यक गर्दी करू नये. सर्व कोरोना लसीकरणाकरिता आवश्यक ती ऑनलाईन नोंदणी करूनच कोरोना लसीकरण केंद्रावर टोकन प्रणालीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कोरोनाचे अनुषंगाने शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही, आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS