Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना मुदतवाढ

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी आणि उन्हाळी हंगामातील अतिरिक्त प्रवासाची गरज लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ (ढजऊ) अं

राज्यात उष्णतेचा तडाखा ; विदर्भात तापमान 44 अंशांपार
काकीनाडा-हिसार विशेष गाडीला मुदतवाढ
‘शरीर सुखासाठी मुलगी पाठव, 10 हजार देतो’ ; पोलिस अधिकाऱ्याची कोठडीतील महिलेकडे मागणी
Tirupati Special Trains : तिरूपती बालाजीच्या भाविकांची मोठी सोय; आणखी एका  रेल्वेगाडीला मुदतवाढ

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी आणि उन्हाळी हंगामातील अतिरिक्त प्रवासाची गरज लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ (ढजऊ) अंतर्गत चालवल्या जाणार्‍या विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि नियोजनबद्ध प्रवास करता येणार आहे. संबंधित सर्व गाड्या पूर्वीप्रमाणेच निश्चित वेळापत्रक आणि थांब्यांनुसार धावतील. मुदतवाढ देण्यात आलेल्या विशेष गाड्या
गाडी क्र. 07605 तिरुपती – अकोला विशेष : शुक्रवारी धावणार; सेवा 17 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्र. 07606 अकोला – तिरुपती विशेष : रविवारी धावणार; सेवा 19 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्र. 07015 नांदेड – तिरुचेंदूर विशेष : शनिवारी धावणार; सेवा 18 एप्रिल 2026पर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्र. 07016 तिरुचेंदूर – नांदेड विशेष : रविवारी धावणार; सेवा 19 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्र. 07189नांदेड – धर्मावरम विशेष : शुक्रवारी धावणार; सेवा 17 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्र. 07190 धर्मावरम – नांदेड विशेष : रविवारी धावणार; सेवा 19 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्र.  07609जालना – तिरुचेंदूर विशेष : सोमवारी धावणार; सेवा 20 एप्रिल 2026पर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्र.07610 तिरुचेंदूर – जालना विशेष : मंगळवारी धावणार; सेवा 21 एप्रिल  2026पर्यंत वाढविण्यात आली.  रेल्वे प्रशासनाचे आवाहन प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास आधीच नियोजित करावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS