Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादीचा बहिष्कारभूमिपूजनावेळी धक्काबुक्कीचा आरोप; कोपरगावमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात निषेध

कोपरगाव : शहरातील सुभद्रानगर येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२२) झालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बहिष्कार टाकला.रविवारी (दि.१९) सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी सत्ताधारी कोल्हे गटाकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना गुंडांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिरासाठी जागा देणारे माजी नगरसेविका यांच्या पती व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब आढाव यांनाही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले.या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत सभेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादासाठी वाद घालण्यापेक्षा विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असून शहरातील पाणीप्रश्नासह अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. आगामी काळातही शहर विकासाच्या विषयांना राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील; मात्र शहराची शांतता भंग करणाऱ्या प्रकारांना समर्थन दिले जाणार नाही, असेही पहाडे यांनी स्पष्ट केले.यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुनील गंगुले यांनी साठवण तलावांच्या कॉंक्रीटीकरणाबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. विरोधकांकडून या विषयावर अपप्रचार केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत असून पूर्वी विकासकामांना विरोध करणारेच आता सत्तेत येऊन गुंडागर्दीला प्राधान्य देत आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. आमदार आशुतोष काळे विकासासाठी निधी आणत असताना सत्ताधाऱ्यांनीही तशा प्रयत्नांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांना प्रवेश नाकारल्याबाबत प्रश्नचिन्हनगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना पुन्हा एकदा प्रवेश नाकारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ मानला जात असताना सभेतील निर्णय जनतेपर्यंत पोहोचू नयेत म्हणून प्रवेश रोखला जातो का, असा सवाल नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

भूमिपूजनासाठी कोल्हेंकडून दमबाजी : कदम
‘शरदचंद्रजी पवार’ पतसंस्थेस सव्वादोन कोटींचा नफा
पाणी मागणी अर्जासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढआ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना दिलासा

COMMENTS