Homeताज्या बातम्याबीड

विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव व्यवस्थापन व मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

तिडके क्लासेस तसेच रामानुजन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘ध्येय निश्चिती, करिअरमधील मानसिक गोंधळ, प

बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!
बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान
राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय शेकटा शाळेची दहावी निकालात यशस्वी परंपरा कायम



तिडके क्लासेस तसेच रामानुजन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘ध्येय निश्चिती, करिअरमधील मानसिक गोंधळ, परीक्षेतील ताण-तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा मनवेध संस्थेच्या अध्यक्षा, मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक मनीषा बिक्कड (घुले) यांनी घेतली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, मानसिक आजारांचे प्रकार तसेच त्यांची सुरुवातीची लक्षणे व कारणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सततची चिंता, नैराश्य, चिडचिड, झोप न लागणे, एकटेपणा जाणवणे आणि अभ्यासात लक्ष न लागणे ही मानसिक समस्यांची प्राथमिक लक्षणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फोबिया तसेच इतर चिंता-आधारित मानसिक विकारांवर वेळेवर समुपदेशन व उपचार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना श्वसनाचे सोपे व्यायाम, वेळेचे नियोजन, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मानसिक आरोग्य सुदृढ असेल तरच शैक्षणिक यश निश्चित साध्य करता येते, असा संदेश त्यांनी दिला. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा मार्गदर्शनपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सक्षम राहण्यास तसेच योग्य वेळी समुपदेशन घेण्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य वाघ सर, शिक्षकवृंद आणि सर्व कर्मचार्‍यांच्या वतीने मनीषा बिक्कड (घुले) यांचे आभार मानण्यात आले.

COMMENTS