Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘संजीवनी’चा कृष्णा नवले सीबीएसई दहावी परीक्षेत प्रथम; १०० टक्के निकालाची परंपरा कायम; ५८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

कोपरगाव : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून

‘के. जे. सोमैया’च्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांत यश
नुकसानीचे  तातडीने पंचनामे करावेत : औताडे 
मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा : आ. आशुतोष काळे


कोपरगाव : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून संजीवनी अकॅडमीने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत कृष्णा संतोष नवले याने ९८.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
या निकालात ९५ ते १०० टक्के गुण मिळविणारे २४ विद्यार्थी असून ९० ते ९४ टक्के गुण मिळविणारे ३४ विद्यार्थी आहेत. अशा एकूण ५८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले आहे.  
  संस्कृती अतुल इनामके हिने ९८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. सुयोग गजानन चौधरी व प्रथमेश संतोष डोखे यांनी प्रत्येकी ९७.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच प्रिशा राहुल बजाज, ईश्वरी सतीश इंगळे व साईश तुषार गलांडे यांनी प्रत्येकी ९७.६० टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला.
मराठी विषयात संस्कृती इनामके, प्रथमेश डोखे, सुयोग चौधरी, ईश्वरी इंगळे, वल्लभ शेळके, प्रेम भास्कर, सानवी ताम्हणे व स्वरूप इंगळे या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळविले. तसेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात कृष्णा नवले, संस्कृती इनामके, सुयोग चौधरी, प्रथमेश डोखे, प्रिशा बजाज, साईश गलांडे, ईश्वरी इंगळे, नेहा गुरली, मिहिका काले, सार्थक जपे, अमेय गाडे व प्रथमेश काजळे यांनी शंभर टक्के गुण मिळवत तंत्रज्ञान क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली.
 या यशासाठी विद्यार्थ्यांना हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे, डायरेक्टर ऑफ ऑडीट सुंदरी सुब्रमण्यम तसेच प्राचार्या अनुश्रिता सिंह यांचे मार्गदर्शन लाभले. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.  

COMMENTS