Homeताज्या बातम्याअहमदनगर

मुख्य रस्त्यावरील दुकाने हटवण्याच्या चर्चेने संताप कर्जतमध्ये सभापती राम शिंदे-आ.रोहित पवार आमने-सामने; नागरिकांत रोष

कर्जत : शहरातील मेन रोडवरील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनतळाच्या पार्श्वभूमीवर दुकाने हटवण्याच्या शक्यतेने कर्जतचे राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी एका कार्यक्रमात “वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भविष्यात भक्कम पाऊल उचलू” असे विधान केल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शिंदे यांच्या वक्तव्यातील ‘भक्कम पाऊल’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय, यावरून शहरात विविध चर्चा रंगल्या आहेत. मेन रोडवरील दुकाने हटवली जाणार का, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला असून, लहान व्यावसायिकांच्या उपजीविकेवर गदा येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी बँकांचे कर्ज काढून किंवा शेती विकून व्यवसाय उभारले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीअभावी मेन रोडवर छोटे-मोठे उद्योग सुरू केले असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.कर्जत शहराची बाजारपेठ मर्यादित उलाढालीची मानली जाते. त्यातच सध्या बाजारातील मंदी, वाढती महागाई आणि औद्योगिक विकासाचा अभाव यामुळे व्यापारी वर्ग अडचणीत आहे. एमआयडीसी किंवा मोठे उद्योग नसल्याने व्यवसाय वाढीस चालना मिळत नसल्याची खंत व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत दुकाने हटवण्याचा निर्णय झाल्यास “प्रपंच उद्ध्वस्त होईल” अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.या घडामोडींमुळे कर्जत शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, वाहतूक कोंडी सोडवताना व्यापाऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यापारी वर्गात सध्या अनिश्चिततेचे वातावरण असून प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका अपेक्षित आहे.आ.रोहित पवारांचा पलटवार, व्यापाऱ्यांना दिलासा दरम्यान, या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. एसटी बसस्थानक परिसरातील कामांची पाहणी करताना त्यांनी, “गरीबांच्या पोटावर पाय देणार का? पदाचा उपयोग असेल तर मतदारसंघासाठी निधी आणा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका केली. तसेच एमआयडीसी, एसटी डेपो आणि प्रशासकीय इमारतींच्या कामांबाबत अडथळे आणल्याचा आरोप करत पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “हे सर्व जनतेला समजते,” असेही त्यांनी नमूद केले.

गुरुकुलमध्ये आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन 
कर्जतमध्ये पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात 
मेहत्रे यांना ७ मेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्ष तीव्र

COMMENTS