Homeव्हिडीओ

हर्षद चेमटे ठरला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचा सुवर्ण विजेता….!

https://youtu.be/CmdFliIjbVk अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील य

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात .
कानपूरमध्ये हायवेवर पेट्रोलचा टँकर उलटला; फुकटचं पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी जीव धोक्यात घालून लावली गर्दी!
फरीदाबादमध्ये डॉक्टराच्या खोलीतून 300 किलो आरडीएक्स जप्त

अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील युवा कुस्तीपटू हर्षद केशव चेमटे याने केली आहे. थायलंडमध्ये सुरू असलेल्या १५ वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत हर्षद चेमटे ने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकावून अंतिम फेरीत कजाकिस्तानच्या येरसुल्तान सुलेमान याच्यावर ११-१० अशा अत्यंत चुरशीच्या फरकाने मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले असून अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात त्याने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आक्रमक खेळी आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर विजय संपादन करून अहिल्या नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावचा रहिवासी असलेल्या हर्षदने अल्पवयातच कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे . यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदके जिंकली आहेत. सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुवर्णयश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केल्याने केदारेश्वर कारखान्याचे अँड प्रतापराव ढाकणे , हनुमान आखाड्याचे वस्ताद गणेश दांगट , कोच रामसिंग राजपूत , पैलवान सागर कोल्हे , उपमहाराष्ट्र केसरी युवराज भोसले , युद्धजीत पंडित , बाळासाहेब सानप ,अरुण मुंडे , नितीन काकडे आदींनी कौतुकाचे थाप दिली आहे .

COMMENTS