Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीकेसीत बनावट नोटा तयार करणार्‍या कारखान्यावर छापा

मुंबई ः मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यात अर्थात 20 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार प्रचारात गुंतले असतांना, राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या

कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार
महाराष्ट्रातील 51 पोलिसांना पदके जाहीर
आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार – आ. चंद्रकांत पाटील 

मुंबई ः मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यात अर्थात 20 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार प्रचारात गुंतले असतांना, राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना मुंबई पोलिसांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करणार्‍या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असून येथून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. येथे 5, 10, 20, 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. मुंबई पोलिसांना बीकेसी येथे एक बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक तयार करून शनिवारी रात्री येथे धाड टाकण्यात आली. या याठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांना दिसले. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच बनावट नोटा आणि त्यासाठी लागणार्‍या कागदाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी नौशाद शाह, अली सय्यद या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. पोलिस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत. या नोटा कुणाला वितरित करण्यात आल्या याचा शोध पोलिस घेत आहेत.

COMMENTS