Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय जोमात तापमान वाढल्याने व्यावसायिकांना मिळाला दिलासा

माजलगांव प्रतिनिधी - शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते . त्यामुळे शेतकरी हवालदील झाले होते . मे महिन्याच्

लोकसंख्यावाढ रोखण्याचे आव्हान
खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन
गोवा बनावटीच्या दारूचा ट्रक पकडण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश

माजलगांव प्रतिनिधी – शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते . त्यामुळे शेतकरी हवालदील झाले होते . मे महिन्याच्या प्रारंभी गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढल्याने शहर व ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे . वाढत्या तापमानाचा फटका बसत असला तरी हंगामात अखेरच्या टप्प्यात का होईना तापमान वाढल्याने कुल्फी , शीतपेय , आइस्क्रीम , लस्सी , बर्फगोळे , सरबत , मसाले ताक विक्री करणार्‍या असंख्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेकडो तरुण चारचाकी हातगाडीच्या माध्यमातून हंगामी व्यवसाय करतात . उकाड्याने त्रस्त नागरिक जिवाची काहिली शमविण्यासाठी थंडपेयांचा आधार घेतात . शहरासह ग्रामीण भागात रसवंती जोरात सुरू झाल्या आहेत . प्रत्येक लग्न समारंभाबाहेर मंगल कार्यालय , लॉन्स आदी ठिकाणी कुल्फी , आइस्क्रीम यासह विविध शीतपेये विक्रेत्यांच्या गाड्यांची संख्या वाढली आहे . शहरातील तापमानाचा पारा यापूर्वीच 42 अंश सेल्सिअसवर पोचला आहे . गेल्या चार दिवसांपासून तापमान 42अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याने दुपारच्या सुमारास बाजारपेठेतील गर्दी मंदावली आहे . वाढत्या उन्हाचा तडाखा वर्‍हाडी मंडळींना बसत असल्याने विवाह सोहळ्यात पंखे , कूलर आदींची गरज भासू लागली आहे . येथील इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांचा या आठवड्यापासून व्यवसाय हळूहळू रुळावर येऊ लागला आहे .  फ्रीज , कूलर , एसी , पंखे आदी वस्तूंची मागणी वाढू लागली आहे . तसेच ही साधने दुरुस्ती करणार्‍या कारागिरांनाही फ्रिज , कुलर दुरुस्तीचे कामे मिळू लागली आहेत . दरम्यान , वाढत्या तापमानामुळे विवाहसमारंभात ताक , मठ्ठा भोजनातील अविभाज्य घटक झाला आहे . दही , तूप , ताक , लोणी आदींची विक्री वाढली असली तरी दूध संकलनात घट झाली आहे . उन्हामुळे दुभत्या जनावरांचे दूध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे . पशुधनाचा सांभाळही शेतकर्‍यांना जिकिरीचा झाला आहे . ग्रामीण भागात गोठ्यांमध्ये दुभत्या जनावरांची काळजी घेण्यासाठी ओले बारदान , स्प्रिंकलरद्वारे पाणी मारून गोठा थंड ठेवला जात आहेत .

COMMENTS