Homeताज्या बातम्या

मुदखेड-आदिलाबाद रेल्वेमार्गावरील अमृत भारत स्थानक विकासकामांची डीआरएम प्रदीप कामले यांच्याकडून पाहणी

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले यांनी गुरुवारी मुदखेड-आदिलाबाद रेल्वेमार्गावरील वि

शेतरस्त्यावर अतिक्रमण; तहसीलदारांचे चौकशी व कारवाईचे आदेशस्थानिक महसूल अधिकार्‍यांवर अविश्वास; बाहेरील अधिकार्‍यांकडून चौकशीची मागणी
माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जि. प. शाळेची इमारत दुरवस्थेत; स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
“प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..”; विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम)  श्री प्रदीप कामले यांनी दि. 23जुलै 2026 रोजी नांदेड–आदिलाबाद ...

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले यांनी गुरुवारी मुदखेड-आदिलाबाद रेल्वेमार्गावरील विविध स्थानकांची पाहणी करून अमृत भारत स्थानक (ABS) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच प्रवासी सुविधांचा आढावा घेतला.

या दौऱ्यात त्यांनी रिअर विंडो निरीक्षणाद्वारे रेल्वेमार्गाची सखोल तपासणी केली. मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट आणि आदिलाबाद स्थानकांवरील विकासकामांची प्रगती, सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. स्थानकांवरील प्रतीक्षालये, फलाट, सर्क्युलेटिंग एरिया, वाहनतळ, स्वच्छता व देखभाल यांचाही त्यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

अमृत भारत स्थानक योजनेतील सर्व कामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्यावर भर देत कामले यांनी विकासकामांच्या गुणवत्ता व गतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच कामांच्या काळात रेल्वे वाहतूक सुरक्षित ठेवून प्रवाशांना कमीत कमी गैरसोय होईल, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानकांचे आधुनिकीकरण, प्रवासी सुविधांमध्ये वाढ आणि सुरक्षित, आधुनिक व ग्राहकाभिमुख रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे कटिबद्ध असल्याचे या पाहणीतून अधोरेखित झाले.

यावेळी अभियांत्रिकी, वाणिज्य, परिचालन, विद्युत, टीआरएसओ, बांधकाम तसेच सिग्नल व दूरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS