Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये रस्त्याच्या मधोमध जाहिरातींची कमान; अपघातांना निमंत्रण; जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप

संगमनेर : सरकारच्या जलसंपदा विभागामध्ये संपूर्ण तंत्रज्ञान इंजिनिअरिंग पद्धतीने वापरले जाते. मात्र इव्हेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या महायुती सरकारने नव्याने या विभागांमध्ये धार्मिकीकरण सुरू केले असून या धार्मिकीकरणाची जाहिरात बाजी करताना रोडच्या मधोमध कमानी उभ्या करून अपघाताला निमंत्रण दिल्याने संगमनेर मधील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.  संगमनेरच्या नाशिक – पुणे रोडवर विविध ठिकाणी जलसंपदा विभागाच्या वतीने कमानी उभ्या करण्यात आले आहे. या कमानी रस्त्याच्या बरोबर मधोमध असून यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. खरे तर जलसंपदा विभाग हा सिव्हिल इंजीनियरिंगशी संबंधित आहे. सर्व भागाला पाणी देणे. पाण्याचे नियोजन करणे पाणी पातळी याबाबत सिव्हिल इंजिनिअरिंग अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र सध्या इंजिनिअरिंग ऐवजी धार्मिकीकरण यामध्ये सुरू आहे.  धर्म बाजूला आणि विकास कामे बाजूला असेल तरच खऱ्या अर्थाने प्रगती होती मात्र सध्या प्रत्येक कामामध्ये धार्मिकीकरण केले जात असून हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महायुतीने संगमनेर शहरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्याच्या मधोमध कमानी लावले आहेत. या कमानी इतक्यामध्ये आले आहे की येणाऱ्या जाणाऱ्या मोठी अडचण निर्माण होत आहे. शनिवारचा बाजारचा दिवस असल्याने संगमनेर मध्ये आज मोठी वर्दळ असणार आहे याच बरोबर सकाळ पासून महाविद्यालयीन विद्यार्थी शहरांमध्ये येणारे नागरिक महिला यांना या कमानींपासून मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तर दोन – तीन ठिकाणी अपघातही झाले आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहे. प्रशासन हे नागरिकाच्या सेवेसाठी असते मात्र सध्याचे प्रशासन हे राजकारण्यांच्या सोयीसाठी होते आहे की काय असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे. रस्त्याच्या मधोमध लावलेल्या या कमानींमुळे नागरिक संतप्त झाले असून महायुतीच्या इव्हेंटबाजीचा खर्च हा जनतेच्या पैशांमधून होत आहे. ही उधळपट्टी जनता कधीही सहन करणार नाही. – अनिकेत घुले, प्रदेशाध्यक्ष, छात्र भारती

श्रीरामपुरात डॉ. आंबडेकरांचा भव्य पुतळा उभारणार; माजी खा. डॉ. सुजय विखे ;  ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित
के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कुरुमकर  

संगमनेर : सरकारच्या जलसंपदा विभागामध्ये संपूर्ण तंत्रज्ञान इंजिनिअरिंग पद्धतीने वापरले जाते. मात्र इव्हेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या महायुती सरकारने नव्याने या विभागांमध्ये धार्मिकीकरण सुरू केले असून या धार्मिकीकरणाची जाहिरात बाजी करताना रोडच्या मधोमध कमानी उभ्या करून अपघाताला निमंत्रण दिल्याने संगमनेर मधील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

 संगमनेरच्या नाशिक – पुणे रोडवर विविध ठिकाणी जलसंपदा विभागाच्या वतीने कमानी उभ्या करण्यात आले आहे. या कमानी रस्त्याच्या बरोबर मधोमध असून यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. खरे तर जलसंपदा विभाग हा सिव्हिल इंजीनियरिंगशी संबंधित आहे. सर्व भागाला पाणी देणे. पाण्याचे नियोजन करणे पाणी पातळी याबाबत सिव्हिल इंजिनिअरिंग अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र सध्या इंजिनिअरिंग ऐवजी धार्मिकीकरण यामध्ये सुरू आहे.

 धर्म बाजूला आणि विकास कामे बाजूला असेल तरच खऱ्या अर्थाने प्रगती होती मात्र सध्या प्रत्येक कामामध्ये धार्मिकीकरण केले जात असून हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महायुतीने संगमनेर शहरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्याच्या मधोमध कमानी लावले आहेत. या कमानी इतक्यामध्ये आले आहे की येणाऱ्या जाणाऱ्या मोठी अडचण निर्माण होत आहे. शनिवारचा बाजारचा दिवस असल्याने संगमनेर मध्ये आज मोठी वर्दळ असणार आहे याच बरोबर सकाळ पासून महाविद्यालयीन विद्यार्थी शहरांमध्ये येणारे नागरिक महिला यांना या कमानींपासून मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तर दोन – तीन ठिकाणी अपघातही झाले आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहे.

प्रशासन हे नागरिकाच्या सेवेसाठी असते मात्र सध्याचे प्रशासन हे राजकारण्यांच्या सोयीसाठी होते आहे की काय असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे. रस्त्याच्या मधोमध लावलेल्या या कमानींमुळे नागरिक संतप्त झाले असून महायुतीच्या इव्हेंटबाजीचा खर्च हा जनतेच्या पैशांमधून होत आहे. ही उधळपट्टी जनता कधीही सहन करणार नाही. – अनिकेत घुले, प्रदेशाध्यक्ष, छात्र भारती

COMMENTS