Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यातील वीज प्रश्न गंभीर; भाजपकडून सभापती राम शिंदेंना निवेदन; उपाययोजनांची मागणी

कर्जत :  तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या वीजपुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. याशिवाय  वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष कर्जत तालुक्याच्या वतीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी  तालुकाध्यक्ष अनिल गदादे, मा. जि. प. सदस्य अशोक खेडकर माजी सरपंच राजेंद्र भोसले माजी सरपंच राहुल गांगर्डे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर,विनोद शिंदे, एडवोकेट राहुल जामदार उपस्थित होते.  निवेदनात  पुढे म्हटले आहे की , गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये  सातत्याने वाड्यावर त्यांवर ग्रामीण भागात ही फ्रिजवर असणारी सिंगल फेज वीजपुरवठा संध्याकाळी सात ते दहा रोज बंद राहत आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच परीक्षेचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गरीब भिर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतीपंप बंद पडल्याने पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  या निवेदनाची दखल घेत राम शिंदे यांनी तात्काळ महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत सुरू करावा याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

..तर, महाराष्ट्र 2028 पर्यंत आर्थिक दिवाळखोरीत निघेल; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा इशारा
भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
कार्यकारी अभियंता दिघावकर यांचा 99 कोटींचा अपहार; राष्ट्रीय महामार्ग मंडळ चेंबूरमध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळाट

कर्जत :  तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या वीजपुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. याशिवाय  वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष कर्जत तालुक्याच्या वतीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी  तालुकाध्यक्ष अनिल गदादे, मा. जि. प. सदस्य अशोक खेडकर माजी सरपंच राजेंद्र भोसले माजी सरपंच राहुल गांगर्डे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर,विनोद शिंदे, एडवोकेट राहुल जामदार उपस्थित होते.

 निवेदनात  पुढे म्हटले आहे की , गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये  सातत्याने वाड्यावर त्यांवर ग्रामीण भागात ही फ्रिजवर असणारी सिंगल फेज वीजपुरवठा संध्याकाळी सात ते दहा रोज बंद राहत आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच परीक्षेचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गरीब भिर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतीपंप बंद पडल्याने पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 या निवेदनाची दखल घेत राम शिंदे यांनी तात्काळ महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत सुरू करावा याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

COMMENTS