Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना भावनिक फोन

मुंबई प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे  यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात ह

अब्दुल सत्तारांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर नीट संस्कार केले नाहीत  
एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, यांच्यात शाब्दिक बाचाबाची  
अखेर एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचे संकेत !

मुंबई प्रतिनिधी – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे  यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात हलवलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने एअर अँम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. दरम्यान, बॉम्बे रग्णालयात सर्व तपासण्या केल्यानंतर खडसेंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना फोन करून मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालंच नसतं, असं ते म्हणाले. एकनाथ खडसे यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची तब्येत चांगली आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे फोन करून आभार मानले. मुख्यमंत्र्यांशी बोलतांना खडसे म्हणाले, खरंतर विषय छोटाच होता. आपल्या दृष्टीकोनातून फार मोठाही नव्हता. मला एअर अँम्ब्युलन्स सापडली नाही. एक मिळाली होती, ती एअर अँम्ब्युलन्स नाशिकला उभी होती. मात्र, एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळं तुम्हाला लवकर मिळाली. मी रुग्णालयात आलो, असं खडसे म्हणाले. ऑपरेश थिएटरमध्ये नेलं तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेण्यात आला. दोन ब्लॉकेज 100 टक्के आणि तिसरे 70 टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. त्यामुळं अँजिओप्लास्टी करण्यात आली. ऑपरेशन व्यवस्थित झालं. कार्डियाक अरेस्ट आला. हृदय 100 टक्के बंद पडलं होतं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रीटमेंट देण्यात आली. जर तुमचे विमान वेळेवर आले नसते तर माझे विमान टेकऑफ झाले असते आणि कधीच लॅंड झालं नसतं. मदत करनेवाला बडा होता है. तुमचे आभार, असं म्हणत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी खडसेंनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

COMMENTS