बीड : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या मराठवाडा महिला आघाडी विभागीय अध्यक्ष पदावर बीड येथील श्रीमती आ

बीड : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या मराठवाडा महिला आघाडी विभागीय अध्यक्ष पदावर बीड येथील श्रीमती आयेशा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र संघटनेच्या वतीने जारी करण्यात आले असून पत्रकारिता क्षेत्रात ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रानुसार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
संघटनेची ध्येय-धोरणे प्रभावीपणे राबविणे, महिला पत्रकारांना संघटित करणे, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर काम करणे तसेच मराठवाड्यात महिला संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. श्रीमती आयेशा शेख या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक विषयांवर सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील महिला पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील महिला पत्रकारांना अधिक सक्षम व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

COMMENTS