Homeताज्या बातम्याबीड

जाटनांदूर येथे गुजर समाजाच्या वतीने महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

शूर योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती जाटनांदूर येथे गुजर समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिम

महावितरणच्या काळे इंजिनिअरचा माज शेतकर्‍यांच्या जीवावरखरात आडगावात वीजेचा तमाशा सुरू!
तोहिद खान हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या-सादिक इनामदार
बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘लाडके भाचे’ आर्थिक संकटातदीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम



शूर योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती जाटनांदूर येथे गुजर समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास गुजर समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गुजर समाज देवसेनेचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर म्हणाले की, महाराणा प्रताप यांचे कार्य डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्यासारखे आहे. त्यांनी अनेक कार्ये केवळ ताकदीने नव्हे तर युक्तीनेही पूर्ण केली. त्यांच्या कार्यात अठरापगड जातीतील लोकांनी साथ दिली होती. मात्र, सध्याच्या काळात समाजामध्ये दरी निर्माण होताना दिसत आहे. कोणताही महापुरुष हा एका जातीपुरता मर्यादित नसून तो सर्व समाजाच्या हितासाठी कार्य करणारा असतो. परंतु आज महापुरुषांना जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न होत असून ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. ते पुढे म्हणाले की, खेड्यापाड्यातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे, हीच सर्व महापुरुषांची शिकवण होती. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवांनी महापुरुषांना केवळ डोक्यावर न घेता त्यांच्या विचारांना आत्मसात करावे. त्यामुळे बुद्धीचा विकास होऊन जीवनात यश प्राप्त होईल. या कार्यक्रमास गुजर समाजाचे तालुकाध्यक्ष शहादेव डोंगर, तुकाराम डोंगर, पिनू डोंगर, प्रा. रवी डोंगर सर, महादेव डोंगर,संजय डोंगर, हनुमान डोंगरयांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS