Homeताज्या बातम्या

संसदेत गदारोळ ; विरोधक राजीनाम्यावर ठाम!खा. राहुल गांधींनी पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या जखमा

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीवरून आणि विद्यार्थी आंदोलनात केलेल्या लाठीचार्जप्रकरणावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा
दडपशाहीचा मार्ग अयोग्य !
अखेर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं! मध्यरात्रीच्या ८८ मिनिटांत ‘इन्साइड स्टोरी’; पडद्यामागे घडल्या मोठ्या हालचाली


नवी दिल्ली : नीट पेपरफुटीवरून आणि विद्यार्थी आंदोलनात केलेल्या लाठीचार्जप्रकरणावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला. विरोधकांनी शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांची राजीनामा घेण्यासाठी ठाम असल्यामुळे शुक्रवारी संसदेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा तातडीने राजीनामा मागितला. या प्रकरणामुळे हजारो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरल्याचा दावा करत त्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. संसद भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला सोबत आणले. पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातावरील जखमा दाखवत त्यांनी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध केला. काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्याचा तसेच एका विद्यार्थ्याने डोळ्याची दृष्टी गमावल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका करत, जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. सभागृहात बोलण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वतःचे बोलणे सुरू असताना ध्वनीप्रणाली बंद करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार या विषयावर चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. विरोधकांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू द्यावे आणि चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांनीही या प्रकरणावर देशाला आश्‍वस्त केले असल्याचे त्यांनी नमूद केले. संसदेबाहेर विरोधी पक्षांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत सरकारवर टीका केली. गोंधळाच्या वातावरणात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज सलग पाचव्या दिवशीही सुरळीत होऊ शकले नाही. अखेर दोन्ही सभागृहे 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. याचदरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2026 राज्यसभेत मांडले. या विधेयकाद्वारे ’वंदे मातरम’ या राष्ट्रगीतासमान मानल्या जाणार्‍या गीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. जाणीवपूर्वक ’वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा त्याच्या गायनात अडथळा आणणे हा दंडनीय गुन्हा ठरणार असून, दोषी व्यक्तीला कमाल तीन वर्षांचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, या विधेयकावर अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.
राजीनामा देईपर्यंत सीजेपी आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम
कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शुक्रवारी आपले देशव्यापी विद्यार्थी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, देशातील तरुणांची एक साधी आणि स्पष्ट मागणी आहे: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जोपर्यंत शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतर येथील आंदोलन सुरूच राहील. जर भारतीय जनता पार्टीला (भाजप) किंवा सरकारला हा प्रश्‍न सोडवायचा असेल, तर त्यावर एकच उपाय आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ते पुढे म्हणाले, पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवल्याने आम्हाला खूप आनंद आणि दिलासा मिळाला आहे.

COMMENTS