Homeताज्या बातम्या

सिंदफणा नदीच्या पुराच्या धोक्यातील डुबा (मजरा) गावाचे तातडीने पुनर्वसन करा-मल्हारी जाधव

बीड : माजलगाव तालुक्यातील डुबा (मजरा) गाव गेल्या अनेक वर्षांपासून सिंदफणा नदीच्या पुराच्या सततच्या धोक्यात जगत आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे ल

पाकिस्तानात शांतता यात्रेदरम्यान बॉम्बस्फोट; १३ लोकांचा मृत्यू, २२ गंभीर जखमी
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील भाम गावातील दुर्दैवी घटना
Sindphana river flooding ,Majalgaon dam

बीड : माजलगाव तालुक्यातील डुबा (मजरा) गाव गेल्या अनेक वर्षांपासून सिंदफणा नदीच्या पुराच्या सततच्या धोक्यात जगत आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना निवेदन सादर करून तातडीने पुनर्वसन करण्याची ठाम मागणी केली.

सिंदफणा नदीच्या पात्रालगत वसलेल्या या गावाला दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितासह शेती, घरे आणि मालमत्तेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. भीतीच्या सावटाखाली गावकर्‍यांचे दैनंदिन जीवन सुरू आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीही विविध स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा करून पुनर्वसनाची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने गावकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी असून ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या डुबा (मजरा) गावाचे कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुनर्वसन तातडीने पूर्ण करून, पुनर्वसित गावात पाणी, रस्ते, आरोग्य, वीज या मूलभूत सुविधा असाव्यात. गावकर्‍यांना सन्मानाने जगण्याचा हक्क देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाने या गंभीर प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मल्हारी जाधव यांनी दिला. या निवेदनावर मल्हारी जाधव, राजू इनामदार, अरविंद जाधव, विनोद जाधव, विश्वास जाधव, प्रमोद लाखे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS