बीड : शब्दांना संघर्षाची धार आणि साहित्याला समाजपरिवर्तनाची दिशा देणार्या साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राहुल मा

बीड : शब्दांना संघर्षाची धार आणि साहित्याला समाजपरिवर्तनाची दिशा देणार्या साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राहुल मागासवर्गीय निवासी वस्तीगृहात शनिवारी (दि.१) ’लेखन प्रेरणा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि मानवतावादी कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास वस्तीगृहाचे अधीक्षक बी. जे. साळवे यांच्यासह भालेराव सर, जोंधळे सर, शिंदे सर, वाघमारे सर आणि गायकवाड सर उपस्थित होते. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आजही असलेली सामाजिक उपयुक्तता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि समाजसेवेची प्रेरणा त्यांच्या कार्यातून घ्यावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास वस्तीगृहातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS