Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.बजरंग सोनवणे घेणार जल्ह्यिाच्या विकासाचा आढावा बैठका;रेल्वे, रस्ते आणि दिशा समितीच्या बैठकांचे दोन दिवस आयोजन

बीड : बीड जल्ह्यिाचे खा.बजरंग मनोहर सोनवणे यांनी जल्ह्यिाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. जल्ह्यिाच्या विकासकामांचा वेग वाढ

महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली : डॉ. प्रमोद गायकेसौ. के.एस.के. महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी
कांदेवाडी येथे कै. शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हरिनाम सप्ताह
लिंबागणेश येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहातउत्सव समिती अध्यक्षपदी रावसाहेब निर्मळ तर उपाध्यक्षपदी सुरज कदम

बीड : बीड जल्ह्यिाचे खा.बजरंग मनोहर सोनवणे यांनी जल्ह्यिाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. जल्ह्यिाच्या विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दि.22 आणि 23 एप्रिल रोजी विविध महत्त्वाच्या समत्यिांच्या बैठकांचे आयोजन करण्याचे नर्दिेश जल्हिाधिकार्‍यांना दिले आहेत. या सलग बैठकांमुळे जल्हिा प्रशासनात मोठी धावपळ उडाली असून खासदार सोनवणे ’क्शन मोड’मध्ये असल्याचे दिसून येत आहे.
खा.बजरंग सोनवणे यांनी जल्हिाधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रानुसार, 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता ’रस्ता सुरक्षा समिती’ची बैठक पार पडणार आहे. यामध्ये जल्ह्यिातील अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर चर्चा केली जाईल. त्यानंतर लगेच दुपारी 2 वाजता ’रेल्वे सुरक्षा समिती’ची बैठक बोलावण्यात आली आहे. बीड जल्ह्यिातील रेल्वे मार्गाची सद्यस्थिती, कामाची प्रगती आणि केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले रेल्वे विकासाचे प्रस्ताव यावर या बैठकीत सवस्तिर आढावा घेतला जाणार आहे. जल्ह्यिातील केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणार्‍या अत्यंत महत्त्वाच्या ’दिशा समिती’ची बैठक दि.23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला जाणार असून, सर्व संबंधित विभागप्रमुखांना पूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे आदेश खा.सोनवणे यांनी दिले आहेत.
अधिकार्‍यांना दिला इशारा
खा.बजरंग सोनवणे यांनी जल्हिाधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, या तन्हिी बैठकांसाठी सर्व संबंधित जबाबदार अधिकार्‍यांनी पूर्ण माहितीसह वेळेवर उपस्थित राहावे. जल्ह्यिाच्या विकासात टाळाटाळ करणार्‍या किंवा माहिती अपूर्ण ठेवणार्‍या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही, असे संकेत या पत्रातून देण्यात आले आहेत.

COMMENTS