Homeताज्या बातम्या

गेवराईत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढलीतालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या नेतृत्वाची चर्चा

शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिंदुत्ववादी, विकासाभिमुख आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणार्‍या

केंद्रात शिवसेनेला 3 मंत्रिपदे मिळणार ?श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकीर आणि प्रतापराव जाधवांच्या नावाची चर्चा
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा उधाण; ठाकरेंच्या 2 खासदारांची शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला उपस्थिती
शिंदेंसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही : ओमराजे निंबाळकर



शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिंदुत्ववादी, विकासाभिमुख आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणार्‍या विचारांना तळागाळात नेण्याचे काम गेवराई तालुक्यात शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांनी गेल्या एका वर्षात अत्यंत प्रभावीपणे केले आहे. संघटन, जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद आणि गावागावात शिवसेनेचा भगवा फडकविण्याच्या निर्धारामुळे त्यांच्या नेतृत्वाची आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
उद्धव बापू मडके यांनी तालुकाप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक आणि घराघरात भगवा हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व्यापक मोहीम राबवली. गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करणे, नव्या युवकांना पक्षाशी जोडणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधणे, बूथनिहाय संघटन उभारणे आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करणे यामुळे गेवराई तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवत उद्धव बापू मडके यांनी पक्षनिष्ठा, शिस्त आणि जनसेवा या तीन तत्त्वांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच विकासकामांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती ठरली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी उभारलेली संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास आणि पक्षासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य यामुळे शिवसेनेच्या जिल्हास्तरीय नेतृत्वात त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नेतृत्वाबाबत मोठा उत्साह असून, भविष्यात त्यांच्यावर अधिक मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविली जावी, अशी भावना अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत. उद्धव बापू मडके यांचा स्पष्ट संदेश आहे की, पद हे ध्येय नसून शिवसेनेची विचारधारा आणि जनतेची सेवा हेच आमचे खरे ध्येय आहे. मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा भगवा अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज गेवराई तालुक्यात शिवसेनेच्या वाढत्या संघटनशक्तीमागे उद्धव बापू मडके यांचे नेतृत्व, सातत्यपूर्ण जनसंपर्क, कार्यकर्त्यांवरील विश्वास आणि पक्षनिष्ठा हेच प्रमुख आधारस्तंभ मानले जात आहेत. आगामी काळातही शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करून शेवटच्या घटकापर्यंत पक्षाचा विचार पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS