Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश

बीड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कल्याण येथील सुभाष टेकडी, लाल चौक परिसरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये वंदना सो

डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके
महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे
माहूर शहरातील शासकीय निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बीड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कल्याण येथील सुभाष टेकडी, लाल चौक परिसरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये वंदना सोनवणे हिने संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुभाष टेकडी, लाल चौक येथे संगीत खुर्ची, रस्सीखेच, वकृत्व आणि गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये संगीत खुर्ची या क्रीडा प्रकारात वंदना सोनवणे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयोजकांच्या वतीने तिला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल तिच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. या प्रसंगी संपादक उत्तम ओव्हाळ, बालासाहेब पणघुले, गोरख काळे, आकाश मस्के, नम्रता सोनवणे, यश कल्याण सोनवणे, गौतम ओव्हाळ, रितेश ओव्हाळ, बाबासाहेब खेमाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS