Homeताज्या बातम्या

नराधम भीमराव कांबळेला अखेर ‘फाशीची शिक्षा’! विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

https://www.youtube.com/watch?v=88MXweU54FM पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने

पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४
मीरा रोडमध्ये ईदीच्या बकऱ्यांमध्ये डुक्कर सोडल्याने तणाव; पोलिसांचे शांततेचे आवाहन
चाकूने वार करून रॉबरी करणारा आरोपी जेरबंद; बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र संतापला होता. या अत्यंत क्रूर आणि संवेदनशील प्रकरणात आज पुणे विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून, नराधम आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
१ मे २०२६ रोजी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना घडली होती. आरोपी भीमराव कांबळे याने खाऊ देण्याच्या बहाण्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची निर्घृण हत्या केली होती. एवढेच नाही तर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि सबळ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या होत्या.
या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने २९ जून रोजी निकाल राखीव ठेवला होता. आज अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन हा गुन्हा अत्यंत क्रूर असल्याचं नमूद केलं. न्यायाधीशांनी विविध कायदेशीर दाखले देत आरोपी भीमराव कांबळे याला थेट मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा जाहीर केली.
या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत मोर्चे काढण्यात आले होते. पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांसह खुद्द आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याला कडक शासन करण्याची मागणी केली होती. आज निकाल ऐकताना कोर्टात चिमुकलीचे आई-वडील उपस्थित होते, तर कोर्टाबाहेर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पीडित कुटुंबाने गेल्या काही दिवसांपासून न्यायासाठी लावलेला लढा अखेर यशस्वी झाला असून, नराधमाला त्याच्या कर्माची अद्दल घडली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातून समाधान व्यक्त होत आहे

COMMENTS