Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्षांच्या अधिवास संवर्धनासाठी कृत्रीम घरट्यांचा पर्याय; करुणाश्रमचा उपक्रम

वर्धा प्रतिनिधी - पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असणाऱ्या वृक्षांची कत्तल, मोबाईल टॉवर्समुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. गेल्य

सीआरपीएफ जवानाचा सहकार्‍यांवर गोळीबारात 3 ठार
अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या रोड रोमिओस अटक
संसदेचा आखाडा

वर्धा प्रतिनिधी – पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असणाऱ्या वृक्षांची कत्तल, मोबाईल टॉवर्समुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. गेल्या काही वर्षांत शहरातूनच नव्हे, तर गावातूनही पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होऊ लागले आहे.पक्ष्यांचा अधिवास नष्ट होऊ  नये आणि पक्ष्यांनाही छोटसं आकर्षक घरटं मिळावं, ही संकल्पना घेऊन पीपल फॉर अॅनिमल्सद्वारा संचालित करुणाश्रमाकडून पक्ष्यांकरिता आकर्षक घरटी तयार करण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात विक्रीसाठी आलेल्या खोप्यांनी रस्ते सजले आहे.शहरातील सिमेंटच्या जंगलांमध्ये जागेचा अभाव, बेसुमार वृक्षतोड, अन्न व पाण्याची कमतरता, स पिकांवर होणारा कीटकनाशकांचा वाढता वापर व मोबाईल टॉवरचे तरंग अशा अनेक कारणांनी पक्ष्यांचे जीवन अडचणीत आले आहे.घराच्या सज्जावर किंवा खिडकीवर घरटे तयार करण्याचा प्रयत्न केला की लगेच ते काढून फेकले जाते. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना राहिलेली नसल्याने पक्ष्यांचा अधिवास कायम राहावा, याकरिता करुणाश्रमात प्लायवूड आणि नारळाच्या असून अतिशय आकर्षक भरती ही तयार करण्यात आली आहे आणि हे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. 

COMMENTS