Homeताज्या बातम्या

भायखळा मोहरम जुलूसमध्ये मोठा अनर्थ टळला; सूडाच्या भावनेतून वाटल्या उंदीर मारण्याच्या १४ हजार गोळ्या, उच्चशिक्षित आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

https://www.youtube.com/watch?v=mH6nheXmHNA मुंबईच्या भायखळ्यातून एक मन सुन्न करणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोहरमच्या पवित्र ज

कर्जतमध्ये अनैतिक संबंधातून खून?मुलीला संशय ; चौकशीची मागणी, ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र सत्तेच्या हव्यासाने भरकटला; नसरापूर घटनेवर राज ठाकरे संतप्त, कठोर कारवाईची मागणी
 लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार 

मुंबईच्या भायखळ्यातून एक मन सुन्न करणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोहरमच्या पवित्र जुलूस दरम्यान उंदीर मारण्याचे औषध म्हणजेच ‘झिंक फॉस्फाईड’च्या कॅप्सूल वाटणाऱ्या एका उच्चशिक्षित नराधमाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फैयाज निसार हुसैन प्रेमजी असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या चौकशीतून जे खुलासे झालेत ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
तपासादरम्यान समोर आले की, फैयाज आणि त्याच्या भावाला त्यांच्या पत्नींनी सोडून दिले होते. यामागे समाजातील लोकांचा हात असल्याचा त्याचा समज होता. याच सूडाच्या भावनेतून त्याने संपूर्ण समाजाला धडा शिकवण्यासाठी हा भयानक कट रचला. गेल्या महिनाभरापासून तो इंटरनेटवर औषध कंपन्या आणि कॅप्सूल बनवण्याची माहिती गोळा करत होता. मोहरमच्या जुलूसमध्ये शरीरावर जखमा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना वेदनाशामक (Painkiller) असल्याचं सांगून त्याने या विषारी गोळ्या वाटल्या.
पोलिसांनी फैयाजकडून १४ हजारांहून अधिक कॅप्सूल जप्त केल्या आहेत. डोंगरी येथील एका हॉटेलमध्ये राहून त्याने एकाच वेळी १०० कॅप्सूल भरता येतील अशा ट्रेचा वापर करून या गोळ्या तयार केल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी ५ ते ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, फैयाजचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. इंटरनेट सर्च हिस्टरी आणि चॅटिंगमधून त्याचे काळे कृत्य उघड झाले आहे.
सुदैवाने गस्तीवर असलेल्या भायखळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. गोळ्यांचे वाटप करताना संशय आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. काही नागरिकांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. फैयाज हा उच्चशिक्षित असून काही काळ इराणमध्येही राहून आला आहे.
सध्या तरी या प्रकरणात कोणतेही दहशतवादी कनेक्शन समोर आलेले नाही, मात्र त्याला कोणी मदत केली का, याचा शोध पोलीस घेत आहेत. फैयाजची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला आज माझगाव न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस त्याची अधिक कोठडी मागणार आहेत. तसेच पुणे आणि इराणमधील त्याच्या कुटुंबीयांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

COMMENTS