किनवट : रात्रीच्या गस्तीदरम्यान वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देत थेट कर्मचार्यांच्या वाहनाला धडक देणार्या तीन सागवान तस्करांना जेरबंद करण्यात व
किनवट : रात्रीच्या गस्तीदरम्यान वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देत थेट कर्मचार्यांच्या वाहनाला धडक देणार्या तीन सागवान तस्करांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एम. मानकर यांनी तीनही आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शेख कासीम शेख उस्मान, शेख जावेद शेख रफिक आणि शेख सोहेल शेख शौकत अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला सागवान लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसले. वन कर्मचार्यांनी संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तस्करांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात थेट वनविभागाच्याच वाहनाला धडक दिली. याप्रकरणी वनविभागाने तत्परतेने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा (क्र. ०२/२०२६) दाखल केला.
सुरुवातीला न्यायालयात हजर केले असता आरोपींना ३ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी संवस के. पी. चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी एम. आर. गुरसाली यांनी आरोपींना पुन्हा किनवट न्यायालयात हजर केले. मा. न्यायालयाने दोषारोप पत्रांची पाहणी करून आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वनविभागाच्या या कठोर व धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचा पुढील तपास वनविभाग करत आहे.

COMMENTS