आरोग्य सेवेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या प्रसिद्ध महिला मुळव्याध तज्ज्ञ डॉ. शितल अक्षय भोपळे यांच्या वतीने ’जागतिक मातृत्व दिना’चे औचित

आरोग्य सेवेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या प्रसिद्ध महिला मुळव्याध तज्ज्ञ डॉ. शितल अक्षय भोपळे यांच्या वतीने ’जागतिक मातृत्व दिना’चे औचित्य साधून विशेष ’मातृत्व सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहानिमित्त शहरातील जालना रोडवरील भोपळे हॉस्पिटल येथे 11 ते 16 मे या कालावधीत महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेकदा महिला संकोच किंवा भीतीपोटी मुळव्याध, भगंदर यांसारख्या व्याधींकडे दुर्लक्ष करतात किंवा कोणाला सांगत नाहीत. मात्र, हे आजार वेळीच ओळखून उपचार करणे गरजेचे असते. महिलांचा हा संकोच दूर व्हावा आणि त्यांना तज्ज्ञ उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात महिला रुग्णांची तपासणी डॉ. शितल भोपळे व त्यांच्या तज्ज्ञ महिला डॉक्टरांच्या टीममार्फतच केली जाणार आहे. सोमवार दि. 11 ते शनिवार दि. 16 मे, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रूग्णांची तपासणी केली जाणार आहे. शिबिरात सहभागी होणार्या रुग्णांना पुढील औषधोपचारांमध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी 9404439845 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट जालना रोडवरील भोपळे हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
शौचाच्या वेळी रक्त पडणे, तीव्र वेदना होणे, खाज येणे किंवा गाठ जाणवणे अशी लक्षणे असल्यास महिलांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. शितल भोपळे यांनी केले आहे.

COMMENTS