Homeताज्या बातम्या

पूर्णवादी बँकेच्या मुख्य कार्यालयास आ. सुरेश धस यांची सदिच्छा भेट; बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा

बीड : आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या बीड येथील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

समाजसेवेचा अखंड वसा जपणारी शिवनेरी पतसंस्था; वारकरी सेवेसाठी रेनकोट वाटप व विविध उपक्रमांमुळे कौतुक
बीडमध्ये ६ आणि ७ ऑगस्टला ‘मुख्यमंत्री महाआरोग्य शिबीर’; जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत मदत पोहोचवा: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
एल निनोच्या संकटात शेतकऱ्यांनी घाबरू नये, वैज्ञानिक पद्धतीने शेतीचे नियोजन करावे – आ. सुरेश धस

बीड : आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या बीड येथील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी आमदार सुरेश धस यांनी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी यांच्यासमवेत बँकिंग क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच देश-विदेशातील सध्याच्या घडामोडी, आर्थिक परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील बदलांबाबतही विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.

या प्रसंगी दैनिक लोकप्रभाचे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संतोष मानुरकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद राजुरीकर, सरव्यवस्थापक महेश पारगावकर, सीसीओ अविनाश हिंगणीकर तसेच वसुली विभाग प्रमुख सतीश जाधव उपस्थित होते. या सदिच्छा भेटीदरम्यान बँकेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून सहकार आणि बँकिंग क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

COMMENTS