Homeताज्या बातम्या

लक्ष्मीच्या पावलांनी झाला शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाचा शुभारंभ

जयसिंग पंडित यांच्याकडून नवजात कन्येच्या नावे ५ हजारांची ठेव गेवराई : जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिस

बीड जिल्ह्यातील बँक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांची नेमणूक करा; अनिल बोर्डे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; गेवराई तालुक्यातील देवीतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा नागरिकांचा आरोप

जयसिंग पंडित यांच्याकडून नवजात कन्येच्या नावे ५ हजारांची ठेव

गेवराई : जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गेवराई येथे प्रसूती विभाग आणि आरोग्यसेवेचा शुभारंभ एका गोंडस कन्यारत्नाच्या जन्माने झाला. रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात जन्मलेल्या या पहिल्या बालिकेच्या आगमनाने परिसर आनंदून गेला असून, लक्ष्मीच्या पावलांनी या विभागाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या आनंदाच्या प्रसंगी जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयसिंग पंडित यांनी नवजात बालिकेच्या नावे ५ हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट (ठेव) जाहीर केली.

पाचेगाव येथील भाविका अनिकेत वाघमारे यांनी शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून नोंदणी केली होती. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून माता व बालकाची प्रकृती उत्तम आहे. नवजात बालिकेचे स्वागत करताना जयसिंग पंडित यांच्या हस्ते माता व बालिकेचा साडी, शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक हावेज शेख, बंडूनाना मोठे, प्रा. बबन काकडे, श्रीराम शेळके, रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमुख डॉ. अजयसिंह पंडित, डॉ. सौ. धनश्री पंडित, डॉ. फिरोज शेख यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग व फार्मसी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS