Homeताज्या बातम्या

पेट्रोल-डिझेल टंचाई आणि महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन

बीड : राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग कमालीचा अडचणीत सापडला आहे. या वाढत्या महागाईच्या आणि इं

आदिशक्ती संत मुक्ताई पालखी मार्गावरील अस्वच्छता व खड्डे तातडीने दुरुस्त करा!मुख्याधिकारी नगरपरिषद व जिल्हाधिकार्‍यांकडे डॉ. गणेश ढवळे यांची निवेदनाद्वारे मागणी
स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
24 कोटींच्या ’माता व बाल’ रुग्णालयात अवघ्या 10 दिवसांतच वॉटर फिल्टर बंद!गळती, लिफ्ट बिघाडानंतर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न; व्यवस्थेवर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल

बीड : राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग कमालीचा अडचणीत सापडला आहे. या वाढत्या महागाईच्या आणि इंधन तुटवड्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी वाहनांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात ‘राम नाम सत्य है, पेट्रोल बडा महेंगा है’ अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात शेख युनुस, शेख मुबीन, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, माजी सैनिक अशोक येडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले आहे की, ऐन उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या हंगामात अनेक पेट्रोलपंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकत असल्याने वाहनधारक हवालदिल झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना कॅन किंवा डब्यांमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने ट्रॅक्टर आणि पाण्याचे पंप ठप्प झाले आहेत. यामुळे शेतीची मशागत खोळंबली असून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

COMMENTS