Homeताज्या बातम्या

समाजसेवेचा अखंड वसा जपणारी शिवनेरी पतसंस्था; वारकरी सेवेसाठी रेनकोट वाटप व विविध उपक्रमांमुळे कौतुक

कडा: सहकार क्षेत्रात आर्थिक सेवा देतानाच समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व जपणारी शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कडा ही संस्था आज सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज केवळ सिंहासनावरच नव्हे, तर रयतेच्या हृदयावर विराजमान झाले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
अमृतसर एक्सप्रेसच्या डब्यात सापडलेल्या मानवी पायाचे गूढ १० दिवसांनंतरही कायम; जीआरपीकडून तपास सुरु
धावत्या लोकल मधून गिरून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कळवा स्थानकाजवळील दुर्घटना

कडा: सहकार क्षेत्रात आर्थिक सेवा देतानाच समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व जपणारी शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कडा ही संस्था आज सामाजिक कार्यामुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहे. संस्थेचे संस्थापक तथा चेअरमन नागेश नवनाथ कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली संस्था आर्थिक व्यवहारांसोबत समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे.

यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पावसाचा अंदाज लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने वारकरी भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसामुळे वारकर्‍यांच्या प्रवासात अडथळे येऊ नयेत, त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि वारी सुखकर व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वारकरी आणि नागरिकांनी या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले.

चेअरमन नागेश कर्डिले हे आमदार सुरेश आण्णा धस यांचे सक्रिय कार्यकर्ते असून सामाजिक, सहकार आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध लोकाभिमुख कामे केली असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, विकासकामे आणि सामाजिक सलोखा यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. याशिवाय ते कडा शहर किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून व्यापार्‍यांना सामाजिक कार्यासाठी एकत्र आणण्याचे काम करत आहेत.

शिवनेरी पतसंस्थेने यापूर्वीही अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. कोरोना महामारीच्या काळात शेकडो गरजू कुटुंबांना मोफत किराणा किटचे वाटप करण्यात आले. स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच अंत्यविधीसाठी स्वर्गरथ (अंत्ययात्रा वाहन) उपलब्ध करून अनेक कुटुंबांना आधार देण्यात आला. धार्मिक सेवाभाव जपत कडा येथील संत मदन महाराज सप्ताह काळात दरवर्षी हजारो भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटपही संस्थेमार्फत केले जाते.

याबाबत बोलताना चेअरमन नागेश नवनाथ कर्डिले म्हणाले, “सहकार म्हणजे केवळ ठेवी आणि कर्ज नव्हे, तर समाजाशी असलेले नाते आहे. समाजाने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाची परतफेड समाजसेवेच्या माध्यमातून करणे हे आमचे कर्तव्य आहे. वारकरी सेवा, गरजूंना मदत आणि सार्वजनिक हिताचे प्रत्येक कार्य करण्यासाठी शिवनेरी पतसंस्था कायम समाजाच्या पाठीशी उभी राहील.”

आर्थिक सेवा, सामाजिक उत्तरदायित्व आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमुळे शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कडा ही संस्था परिसरात समाजसेवेचा आदर्श निर्माण करत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS