Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते आज आ.बोंढारकरांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी पुत्र आ.आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हिंगोली गेट येथील शिवनेरी या जनसंपर्क कार्यालयाचे

एसआयआर अंतर्गत नांदेड दक्षिणमध्ये तहसीलदार संजय वारकड यांची चौफाळा भागात पाहणीप्रत्यक्ष गणना फॉर्म भरून डिजिटायझेशनचे प्रात्यक्षिक
मंत्री सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा; पत्नी आणि मुलावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप
सुयोग किड्झ स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालवारकर्‍यांची भक्तिमय दिंडी

नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी पुत्र आ.आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हिंगोली गेट येथील शिवनेरी या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज रविवार दि. 29 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
सायंकाळी 5  वाजता पार पडणार्‍या उद्घाटन सोहळ्यास राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्यासह नामदार हेमंत पाटील,आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार बाबुराव कदम कोहळीकर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.  नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेतकरी , सर्वसामान्य नागरिक आणि जनतेसाठी हे संपर्क कार्यालय सदैव खुले असणार आहे. त्यामुळे जनकल्याणासाठी शिवनेरी जनसंपर्क कार्यालय आज पासून लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . शिवनेरी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी – माजी लोकप्रतिनिधींनी ,आजी-माजी पदाधिकार्‍यांनी आणि शिवसैनिकानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS