Homeकृषी

चांदोली धरण आजपासून पर्यटनासाठी बंद

शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाकडून प्राप्त सूचना व आदेशानुसार चांदोली येथील पर्यटन आज मंगळवार, ता. 11 पासून पु

शेतकर्‍यांना चिरडणे पूर्वनियोजित कट ; लखीमपूर खेरी प्रकरणात एसआयटीचा गंभीर खुलासा
शेती महामंडळाच्या स्थावर व्यवस्थापक पदावर आता तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीस सुरुवात
कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकऱ्याने संपवीली जीवनयात्रा

शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाकडून प्राप्त सूचना व आदेशानुसार चांदोली येथील पर्यटन आज मंगळवार, ता. 11 पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद राहील.
यापूर्वीच कोरोनाच्या नियमांचे पालन म्हणून लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या पर्यटकांनाच चांदोली प्रवेश देण्यात येत होता. आता त्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. आज मंगळवारपासून संपूर्ण पर्यटन बंद करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोली धरण शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांनी केले आहे.

COMMENTS