Homeताज्या बातम्या

आ. आनंदराव बोंढारकर यांची ज्येष्ठ नागरिकांना ग्वाही; अधिवेशनात प्रश्न मांडून न्याय मिळवून देणार

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह विविध प्रलंबित प्रश्नांवर येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के

महावितरणच्या ’शॉक’मुळे किनवटकर हैराण; शहर अंधारात, जनआंदोलनाचा इशारा!
भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच माणूस!
चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्या तात्काळ सोडवा-ब्लॅक पँथर
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर जी यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ...



राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह विविध प्रलंबित प्रश्नांवर येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याची ठाम ग्वाही नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव   बोंढारकर यांनी दिली आहे. प्रसंगी लक्षवेधी सूचनाही मांडण्यास आपण मागेपुढे पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम, नांदेडच्या वतीने डॉ. हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटूरकर, गिरीश बार्हाळे, माधवराव पवार काटकळंबेकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आमदार बोंढारकर यांच्याशी संपर्क साधला. निवासस्थानी भेट न झाल्याने त्यांनी दिलेला शब्द पाळत स्वतः वैद्य रुग्णालयात येऊन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि व्यथा अत्यंत आत्मीयतेने जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी डॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली फेस्कॉमने केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. शहरी आणि ग्रामीण भागातील, विशेषतः झोपडपट्ट्यांतील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समाज, प्रशासन आणि शासनापुढे सातत्याने मांडण्याचे काम अत्यंत तळमळीने करण्यात आले असून, मोर्चे, आंदोलने आणि जनजागृतीद्वारे ज्येष्ठांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा अनुभवसंपन्न घटक असून त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. त्यांच्या मानधनासह सर्व प्रलंबित प्रश्नांवर अधिवेशनात सकारात्मक चर्चा होईल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने सुरू असलेल्या या चळवळीमुळे आता त्यांच्या प्रश्नांकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधले जात असून, येत्या अधिवेशनातून ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS