Homeताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.आनंदराव  बोंढारकर यांनी घेतली सदिच्छा भेट

नांदेड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  मुंबई येथील मंत्रालयात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव  बोंढारकर यांनी

81 लाख महिलांना वगळले बहिणींनो सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे
जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना धक्कासमीर सत्तार आणि आमदार संजना जाधव यांचे अर्ज बाद
राजभवनात मराठवाड्याची ‘व्हीआयपी’ हजेरी; प्रश्नांना लाल दिवा मिळाला, उत्तरांना अजूनही प्रतीक्षाच!


नांदेड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  मुंबई येथील मंत्रालयात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव  बोंढारकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान नांदेड दक्षिण मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शासकीय सेवा आणि विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आमदार बोंढारकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले. आ. बोंढारकर यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नांदेड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्याचे आमदार बोंढारकर यांनी सांगितले. या भेटीमुळे नांदेड दक्षिण मतदारसंघातील विविध विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS