Homeअहमदनगरमुंबई - ठाणे

महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे -आ.बोंढारकरशिबिरात 702 डिजिटल सातबारा व  669आठ-अ उतार्‍यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

 शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. 1) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्

महसूल व्यवस्थेचा ‘काळाबाजार’; तलाठी कार्यालये बनली भ्रष्टाचाराची अड्डे
नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर धडक कारवाई : 41 आरोपी जेरबंद, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
परशुराम जयंतीच्या पूर्वी परशुराम चौकाचे सुशोभीकरण करा; महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष द्यावे



 शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. 1) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तिसरे शिबिर विष्णुपुरी येथे उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी उपस्थित राहून विविध विभागांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित विभागांना त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना केल्या. तहसील कार्यालयामार्फत विविध प्रमाणपत्रे विहित मुदतीत दिली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, एकाच ठिकाणी नागरिकांना उत्तम सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख (मोजणी), दुय्यम निबंधक, महावितरण आदी विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले. तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये 702 ऑनलाईन सातबारा उतारे व  669आठ-अ उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 10 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले. शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा, 8-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य, भूमिअभिलेख व पंचायत विभागांनीही विविध सेवा पुरवल्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. नायब तहसीलदार माचेवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पुरवठा विभागातील श्रीमती मारतळेकर व श्रीमती पवार यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले. तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे, तलाठी रमेश गिरी, मनोज जाधव, मनोज सरपे, माधव भिसे तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी विशेष योगदान दिले. शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
———

COMMENTS