Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

राहुरी ः महादेवाचे प्रसिद्ध ठिकाण असणार्‍या राहुरी खुर्द येथील श्री राजेश्‍वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्

तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी नियमित डॉक्टर उपलब्ध असावे ; काँग्रेसची मागणी
राहुरीत खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Belapur : लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अटक (Video)

राहुरी ः महादेवाचे प्रसिद्ध ठिकाण असणार्‍या राहुरी खुर्द येथील श्री राजेश्‍वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजेश्‍वर मंदिर देवस्थानच्या वतीने देण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार 8 मार्च रोजी सकाळी कावड्यांची मिरवणूक होत महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात येणार आहे. प्रवीण उदमले यांच्यातर्फे श्री राजेश्‍वर महादेवाला महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे. तर भाविकांचे वाढती गर्दी लक्षात घेता राजेश्‍वर देवस्थानच्या भक्तांकडून विविध प्रकारच्या कामांचे नियोजन करण्यात आलेले आहे. मंदिर व मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून भाविकांच्या सोयीची अनेक कामे करण्यात आली आहेत. शनिवारी सकाळी हेमलता ताई पिंगळे महाराज यांचे काल्याचे कीर्तनानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसाद भंडारा चे आयोजन करण्यात आले असून शिवभक्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेश्‍वर मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS