Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रायव्हरनं मालकाच्या घरातून केली चोरी

सोलापूर प्रतिनिधी - मालकाबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला म्हणून, ड्रायव्हरने काटा काढण्याचा निर्णय घेतला. मालक परगावी गेल्याची संधी साधून त्

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नवदाम्पत्याचा मृत्यू
चक्क बोनस मध्ये जिवंत कोंबडी आणि दारूची बॉटल

सोलापूर प्रतिनिधी – मालकाबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला म्हणून, ड्रायव्हरने काटा काढण्याचा निर्णय घेतला. मालक परगावी गेल्याची संधी साधून त्याने घरातील ५० लाख ९० हजारांची रोख रक्कम व २१ तोळे सोने चोरून नेले होते. याप्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आले.  न्यायालयासमोर उभे केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उमेश यादव असे अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. उमेश यादव हा आशिष पद्माकर पाटोदेकर यांचा  ड्रायव्हर म्हणून कामाला होता.गेल्या अडीच वर्षांपासून तो काम करीत होता.आशिष पाटोदेकर हे ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजता कुटुंबीयांसमवेत कामानिमित्त पुणे येथे गेले होते.

१ फेब्रुवारी रोजी पहाटे आशिष पाटोदकर हे घरी आले असता, कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ४५ लाख रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले.नंतर त्यांना २१ तोळे सोने आणि पाच लाख ९० हजार ५०० रुपयेही चोरीला गेल्याचे लक्षात आले.याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. चोरीप्रकरणी ड्रायव्हरला अटक केल्यानंतर त्याच्याजवळ ५० लाख ९० हजार ५०० रुपयाची रोख रक्कम मिळून आली. राहिलेले २१ तोळे दागिने त्याने सोलापुरातील भाड्याच्या घरात जिन्याच्या फरशीखाली ठेवली होते,तेही काढून दिले. पैसे आणलेले रिकामे पोते गादीमध्ये लपवून ठेवले होते तेही काढून दिले. दरम्यान,गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केला असता, त्यांच्याकडे कोणी नोकर काम सोडून गेला का,याची माहिती घेतली. तेव्हा १५ दिवसांपूर्वीच एका ड्रायव्हरला काढून टाकल्याचे सांगितले. त्याचे मोबाइल लोकेशन पाहिले असता तो सोलापुरात होता.पोलिस आपल्या मार्गावर आहेत असे लक्षात आल्यानंतर तो पुण्याला गेला.पोलिसांनी तपास करीत सातारा-पुणे रोड गाठला,तेथे त्याला अटक करण्यात आली. रुमची तपासणी केली असता त्याच्याकडे रोख रक्कम ५० लाख ९० हजार ५०० रुपये सापडले. अटक करून सोलापुरात आणले तेव्हा त्याने घरात ठेवलेले २१ तोळे सोने काढून दिले.

COMMENTS