Homeताज्या बातम्या

छतावर टेंट उभारताना विजेचा धक्का; देगलूरातील 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यूबारशाच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडली दुर्घटना

देगलूर शहरातील 27 वर्षीय युवकाचा घराच्या छतावर टेंट उभारत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी

कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यूफरशी धुण्याचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ
गोदावरी नदीत बुडून तिघींचा मृत्यू
मनमाड महामार्गावर एका भीषण अपघाताने तरुणाचा बळी 



देगलूर शहरातील 27 वर्षीय युवकाचा घराच्या छतावर टेंट उभारत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे देगलूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव रितेश वैजनाथ बत्तींनवार (वय 27) असे असून ते देगलूर येथील रहिवासी होते. ते पाटील बार अँड रेस्टॉरंटचे चालक वैजनाथ बत्तींनवार यांचे कनिष्ठ चिरंजीव होते. मिळालेल्या माहितीनुसार, रितेश बत्तींनवार हे देगलूर-औराद मार्गावरील जीवन पांचाळ यांच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांच्या कुटुंबात बारशाचा कार्यक्रम असल्याने घराच्या छतावर टेंट उभारण्याचे काम सुरू होते. यावेळी त्यांच्या हातातील लोखंडी बांबू घराजवळून जाणार्‍या उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी देगलूर येथील कद्रेकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या आकस्मिक दुर्घटनेमुळे बत्तींनवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रितेश यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे देगलूर शहरात शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

COMMENTS