Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

इटालियन ओपन स्पर्धेत जोकोविचचा पराभव

रोम : सहा वेळा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत

 कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रमटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विखे पाटील सैनिक स्कूलचे २१ जलतरणपटू 
लिंडा नोस्कोव्हाची विम्बल्डनची नवी सम्राज्ञीकॅरोलिना मुचोव्हावर तीन सेटमध्ये मात; चेक महिला टेनिसचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित

रोम : सहा वेळा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत ७९ व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाच्या डारिओ प्रिझमिचने दमदार खेळ करत जोकोविचला तीन सेटच्या लढतीत पराभूत केले. प्रिझमिचने २-६, ६-२, ६-४ अशा फरकाने विजय मिळवत पुढील फेरी गाठली.

पहिला सेट सहज गमावल्यानंतर प्रिझमिचने शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या सेटपासून त्याने आक्रमक खेळ करत जोकोविचवर सतत दबाव निर्माण केला. अनुभवी जोकोविचला आपली लय कायम राखता आली नाही आणि त्याच्याकडून अनेक चुका घडल्या. निर्णायक तिसऱ्या सेटमध्येही प्रिझमिचने संयम राखत सामना आपल्या बाजूने फिरवला. रोममध्ये झालेल्या या स्पर्धेत सलामीचा सामना गमावण्याची वेळ जोकोविचवर प्रथमच आली आहे.

प्रिझमिचसाठी हा कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मानला जात आहे. याआधी त्याने माद्रिदंमधील प्रतिष्ठित स्पर्धेत अव्वल दहामधील बेन शेल्टनचा पराभव केला होता. आता प्रिझमिच चौथ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी युगो हम्बर्टविरुद्ध खेळणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला जोकोविचने अवघ्या ४० मिनिटांत पहिला सेट जिंकत वर्चस्व दाखवले होते. मात्र त्यानंतर प्रिझमिचने धडाकेबाज खेळ करत अनुभवी खेळाडूला अडचणीत आणले. त्याच्या सातत्यपूर्ण खेळामुळे जोकोविचला अपेक्षित अचूकता साधता आली नाही.

दरम्यान, जोकोविच या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला होता. महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी तो पुन्हा सज्ज होण्याचा प्रयत्न करीत आहे. विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याचे लक्ष्य त्याच्यासमोर आहे.

COMMENTS