Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली खळबळजनक घटना

देवळाली प्रवरा प्रतिनिधी - वडार समाजाला वर्षभर 200 ब्रास दगड काढण्याची राज्य शासनाच्या  आदेशानुसार परवानगी असताना देहरे (ता.नगर) येथील रेवणनाथ शा

मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
9  वर्षीय इन्स्टा क्वीनची आत्महत्या
लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.

देवळाली प्रवरा प्रतिनिधी – वडार समाजाला वर्षभर 200 ब्रास दगड काढण्याची राज्य शासनाच्या  आदेशानुसार परवानगी असताना देहरे (ता.नगर) येथील रेवणनाथ शालिकराम धनवटे या तरुणाचा ट्रॅक्टर अडवून जप्त केला. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी राहुरी तहसीलदारांच्या मनमानी कारभाराला वैतागून रेवणनाथ शालिकराम धनवटे (वय 41 वर्षे) या वडार समाजाच्या युवकाने आत्महत्या केली आहे. दरम्यान, या घटनेने संतप्त झालेल्या धनवटे परिवाराने व त्यांच्या नातेवाईकांनी राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही, तोपर्यंत रेवणनाथचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पविञा घेतला आहे.

याबाबत माहिती अशी की, राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी वडार समाजास राज्य शासनाच्या आदेशानुसार 200 ब्रास दगड काढण्याची परवानगी असताना रेवणनाथ धनवटे याचा ट्रॅक्टर पकडला. त्याचवेळी त्यांना दगड उत्खननाची रितसर परवानगी दाखविली. पण, असे असतानाही त्याला त्याचे वाहन ताब्यात न देता ते जप्त करण्यात आले. विनंती करुनही वाहन ताब्यात मिळत नसल्यामुळे नैराश्य पत्कारुन हा युवक दोन दिवसापासून बेपत्ता झाला होता. रविवारी 11 डिसेंबर रोजी या युवकाची मृतदेह नेवासा येथील नदीपात्रात आढळून आला आहे.

रेवणनाथचा मृतदेह नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या तरुणाच्या आत्महत्ये मागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. संतप्त नातेवाईकांनी राहुरीच्या तहसीलदारांनी दगड वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून जप्त केला. दगड वाहतुकीचा परवाना दाखवूनही तहसीलदार शेख यांनी ट्रॅक्टर सोडला नाही. मात्र, यामुळे रोजीरोटी बंद पडणार असल्याच्या नैराश्यातून हा तरुण गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाला होता. नेवासा येथील नदीपात्रात त्याने आत्महत्या केली. नेवासा तालुक्यातील नेवासा ग्रामीण रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. त्या युवकाकडे संपूर्ण उत्खननाची परवानगी असतानाही त्याला त्याचे वाहन ताब्यात देण्यात आले नाही. या जाचाला कंटाळून या युवकाने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

COMMENTS