Homeताज्या बातम्या

राज्यसभेसाठी नवनीत राणा यांची मोर्चेबांधणी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट

मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध नावांची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादीत मोठी फेरबदल! प्रफुल्ल पटेलांचे पद गेले, सुनेत्रा पवारांच्या नव्या पत्राने पार्थ आणि जय पवारांची ताकद वाढली
इतर राज्यातील मुख्यमंत्री उदयोग धंदे पळवतील अस होत नाही :अजित पवार | LOKNews24
कांदा व ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
Maharashtra Rajya Sabha Seat Suspense; Chhagan Bhujbals Conditions | Navneet  Rana Meets Sunetra Pawa

मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध नावांची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अनेक इच्छुकांकडून प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे.

अलीकडेच नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राज्यसभा उमेदवारीसंदर्भातील चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. या भेटींचा आणि उमेदवारी प्रक्रियेचा थेट संबंध असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले, तरी राजकीय वर्तुळात विविध तर्कांना उधाण आले आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेतेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. विशेषतः छगन भुजबळ यांचे नाव संभाव्य दावेदारांमध्ये घेतले जात आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने इच्छुकांकडून संपर्क मोहीम, बैठका आणि राजकीय सल्लामसलतींना वेग आला आहे. विविध पक्षांतील नेते आणि पदाधिकारी यांच्यात चर्चा सुरू असून आगामी काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

नवनीत राणा यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अलीकडील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांनी काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेचीही राजकीय वर्तुळात नोंद घेतली जात आहे.

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सामाजिक माध्यमांवरील एका संदेशातून राज्यसभा जागेबाबत पक्षाची भूमिका अधोरेखित केली. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, तोच अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS