गावठी कट्टे झाले प्रतिष्ठेचे… धमक्यांच्या उद्योगाला येते धार…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावठी कट्टे झाले प्रतिष्ठेचे… धमक्यांच्या उद्योगाला येते धार…

39 गावठी कट्टे व 58 जिवंत काडतुसे जप्त, 44 आरोपी अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : खोट्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन आणि धमक्यांच्या उद्योगाला धार येण्यासाठी गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर जिल्ह्यात सुरू आहे व जिल्ह्याती

माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…
नगरच्या स्वामी समर्थ मठात उद्यापासून धार्मिक उपक्रम
लोकशाही रक्षणाची जबाबदारी सांगणारे साहित्य संमेलन ः रतनलाल सोनाग्रा

अहमदनगर/प्रतिनिधी : खोट्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन आणि धमक्यांच्या उद्योगाला धार येण्यासाठी गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर जिल्ह्यात सुरू आहे व जिल्ह्यातील तरुणांमध्ये गावठी कट्ट्याचे फॅडही वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा प्रकरणी वर्षभरात 30 ठिकाणी कारवाई करीत 44 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 39 गावठी कट्टे, 58 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
वाळू तस्करी व संघटित गुन्हेगारीमध्ये गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर होत आहे. 15 ते 30 हजार रुपयांमध्ये सहज उपलब्ध होणारा गावठी कट्टा फायर सेफ्टीच्यादृष्टीने अत्यंत घातक असताना त्याचा सुळसुळाट वेगाने होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशात वरला पोलीस ठाणे हद्दीत उमरठी या ठिकाणी गावठी कट्ट्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये स्टील, लोखंडाचा वापर केला जातो. कमी किमतीमध्ये सहज उपलब्ध होणार्‍या गावठी कट्ट्यांतून फायर केल्यास ती उलटण्याची भीती जास्त असते. उत्तर प्रदेशातूनही नगर जिल्ह्यात गावठी कट्टे येतात. यामध्ये खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट सक्रीय आहे. पोलिसांनी गावठी कट्टे पकडले असले तरी जिल्ह्यात येणार्‍या कट्ट्यांची साखळी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
मध्यप्रदेशात 10 ते 15 हजार रुपयांत मिळणारा गावठी कट्टा येथे 25 ते 30 हजार रुपयांत विकला जातो. गावठी कट्टे जिल्ह्यात येताना सीमेवर फारसा अडथळा येत नाही. जिल्ह्यातील वाळू तस्कर, लुटमार करणारे सराईत गुन्हेगार यांच्यासह गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या तरुणांकडेही गावठी कट्टे मिळून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये काही तरुणांनी तर गावठी कट्टे फक्त प्रतिष्ठेसाठी बाळगले असल्याची कबुली दिली आहे. कॉलरबाज अन् धमकीबाजांना गावठी कट्ट्यांची क्रेझ असून, कट्टेबाजांचा जिल्ह्यात सुळसुळाट झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी अवैध गावठी कट्ट्यांची शोधमोहिम हाती घेतली आहे.

COMMENTS