Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री भुजबळ यांचे सभापती राम शिंदेंकडून स्वागत  

कर्जत : जामखेड कर्जत मतदार संघाच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांचे अहिल्यानगर येथे उत्स्फूर्त स्वागत करण्य

व्यक्ती बेपत्ता; शोधासाठी बेलवंडी पोलिसांचे आवाहन
‘ग्रामपंचायत अधिकारी संघा’च्या राज्य उपाध्यक्षपदी तरटे
संगमनेरच्या दत्तधाम आश्रमची मोठी उपडेट; पोलिसांना दत्तधाम मधून औषधांचा साठा आणि २०० व्हिडिओस् जप्त

कर्जत : जामखेड कर्जत मतदार संघाच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांचे अहिल्यानगर येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल गदादे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर तसेच काकासाहेब ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वातावरण उत्साही केले.
दौऱ्यादरम्यान विविध विकासकामे, अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधित प्रश्न तसेच स्थानिक पातळीवरील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भुजबळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. या स्वागत सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS