Homeताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक

बेलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. २२) भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, श्रीरामपूर ग्रामीण मंडलाच्या वतीने बेलाप

सदाभाऊ खोतांनी आंदोलनकर्त्यांना “आतंकवादी” संबोधल्यावरून वादंग; विरोधकांची टीका, बच्चू कडूंकडूनही विधान मागे घेण्याचा सल्ला
हदगाव येथे भाजपची बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक २७ जून रोजी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार
श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सत्कार

बेलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. २२) भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, श्रीरामपूर ग्रामीण मंडलाच्या वतीने बेलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र प्रदेश भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी तसेच प्रदेश भाजपा महामंत्री व अल्पसंख्यांक मोर्चा प्रभारी राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उत्तर अहिल्यानगर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्हा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर ग्रामीण मंडलाचे अध्यक्ष अजीज शेख यांनी मोहसीन सय्यद व आसिफ बागवान यांच्या सहकार्याने बेलापूर येथे या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. यावेळी प्रदेश महामंत्री एजाज शेख, प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, फत्तुभाई सय्यद, आसिफ पठाण आणि शब्बीर शेख यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या शिबिराचे उद्घाटन बेलापूर शहर भाजपा अध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद नवले, निलेश हरदास, अभिषेक खंडागळे, देविदास देसाई, मारुतीराव राशिनकर, सचिन अमोलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. लिप्टे तसेच जोंधळे ब्लड बँक श्रीरामपूर यांचे विशेष सहकार्य लाभले.

COMMENTS