Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंथन परिक्षेत ऋग्वेद कारंजकर केंद्रात प्रथम 

श्रीगोंदा : येथील महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी ऋग्वेद साकेत कारंजकर याने राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेल्फेअर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत ऋग्वेदने उत्कृष्ट कामगिरी करत सेंटर रँकमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तसेच राज्यस्तरावर ४० वा आणि जिल्हा/विभाग स्तरावर ३५ वा क्रमांक मिळवत त्याने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. ऋग्वेद हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असून लहान वयातच त्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रुग्वेदच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांची गय नाही; पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी; जामखेड पोलिसांची मुख्य रस्त्यावर विशेष मोहीम
अवघ्या दोनशेच्या स्टॅम्पवर व्यावसायिक वीज कनेक्शन; शेतकऱ्यांना मात्र महिनोन्‌महिने प्रतीक्षा; कोपरगावात महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
संगमनेरच्या दत्तधाम आश्रमची मोठी उपडेट; पोलिसांना दत्तधाम मधून औषधांचा साठा आणि २०० व्हिडिओस् जप्त

श्रीगोंदा : येथील महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी ऋग्वेद साकेत कारंजकर याने राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेल्फेअर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत ऋग्वेदने उत्कृष्ट कामगिरी करत सेंटर रँकमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तसेच राज्यस्तरावर ४० वा आणि जिल्हा/विभाग स्तरावर ३५ वा क्रमांक मिळवत त्याने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.

ऋग्वेद हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असून लहान वयातच त्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रुग्वेदच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

COMMENTS