Homeताज्या बातम्या

पगारे यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार

कोपरगाव शहर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या "राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी प

तेलंगणा-आंध्रकडे बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांचा वाढता कल; स्थानिक कृषी सेवा केंद्रांवरील विश्वासाला तडा?
जंतर मंतरवर तरुणांचे आंदोलन तीव्र; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉकरोच जनता पार्टी ठाम, सरकारच्या चर्चेच्या आवाहनाला नकार
शांततापूर्ण आंदोलन करणे घटनात्मक अधिकार; लाठीमार करणे अयोग्य: सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

कोपरगाव शहर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या “राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार” साठी अहिल्यानगर जिल्ह्यातून एकमेव निवड कोपरगाव तालुक्यातील धोत्रे व शिंगणापूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अविनाश सिताराम पगारे यांची झाली आहे. त्यांच्या उत्कृष्ट, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासकीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर केला असून, यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र शासनाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत अविनाश पगारे यांनी हा बहुमान मिळविला आहे.

विविध कामांसह नुकत्याच पार पडलेल्या आर. आर.आबा स्वच्छ व सुंदर गांव स्पर्धेत तालुका स्तरीय प्रथम क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात त्यांच्या कार्यक्षेत्रातील धोत्रे ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता.

ग्रामपंचायतीतील पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख सेवा, विकासकामांतील गुणवत्ता आणि ग्रामविकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या आधारे त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामविकास व पंचायत राज मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पंचायत समिती प्रशासन, सहकारी अधिकारी, विविध सामाजिक संघटना तसेच सर्व स्तरातील मान्यवरांकडून अविनाश पगारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS