Homeताज्या बातम्याविदेश

पुतिन विरोधक वॅग्नरप्रमुख प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू

रशिया प्रतिनिधी - रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एका खासगी विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच

चांदोली राष्ट्रीय उद्यानात झाडांची राजरोसपणे कत्तल
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा
विखेंनंतर आता बाळासाहेब थोरात करणार संगमनेरमध्ये शक्तीप्रदर्शन…

रशिया प्रतिनिधी – रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एका खासगी विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांचाही यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. येवगेनी प्रीगोझिनच्या मृत्यूचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान घडला आहे. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, क्रॅश झालेले विमान प्रीगोझिनचे होते. प्रीगोझिनने जूनमध्ये रशियन सशस्त्र दलांविरुद्ध अयशस्वी बंडखोरी केली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात येवगेनी प्रीगोझिन यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यानंतर हे बंड त्यांनी मागे घेतले होते. वॅग्नर या खाजगी सैन्य दलाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी रशियन वृत्तसंस्थांनी दिली आहे. पुतीन ब्रिक्स परिषदेसाठी आफ्रिकेत असतानाच ही घडामोड घडली आहे. 24 जून रोजी वॅग्नर या खासगी सैन्य दलाने रशिया विरुद्ध बंडाची घोषणा केली होती.

मॉस्कोपासून उत्तरेला शंभर किलोमीटर अंतरावर कोसळले विमान – अपघात झालेलं विमान हे मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गच्या दिशेनं चाललं होतं. हे विमान वॅग्नर या खासगी लष्करी कंपनीचे संस्थापक प्रीगोझीन यांच्या मालकीचे असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. रशियातील हवाई वाहतूक नियामक यंत्रणा रोसाव्हितासियाने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या यादीमध्ये प्रिगोझीन यांचे नाव आहे. या विमानाचा अपघात झाला तेव्हा विमानामध्ये तीन वैमानिकांसह सात प्रवासी होते. रशियन तपास संस्था सध्या या अपघाताची चौकशी करत आहेत. मॉस्कोपासून उत्तरेला शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या त्वेर भागामध्ये हे विमान कोसळले. युक्रेनविरोधातील युद्धामध्ये रशियाच्या बाजूने लढणाऱ्या वॅग्नर समूहाच्या प्रीगोझीन यांनी थेट पुतीन यांच्याविरोधात यंदा दंड थोपटले होते. पुतीन यांनी आक्रमक पवित्रा घेताच त्यांनी माघार घेतली होती.

COMMENTS