शेवगाव: 'कोटा एक्सलन्स सेंटर'ने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NEET) पुन्हा एकदा आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. नीट परीक्षेत ५९८ गुण मिळव

शेवगाव: ‘कोटा एक्सलन्स सेंटर’ने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NEET) पुन्हा एकदा आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. नीट परीक्षेत ५९८ गुण मिळवून घवघवीत यश संपादन करणारा विद्यार्थी प्रतीक खरमाटे तसेच ‘अवेसीना मेडिकल युनिव्हर्सिटी’मध्ये एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित झालेली गुणवंत विद्यार्थिनी अल्फिया शेख हिचे वडील शेख यांचा ३० जुलै रोजी सेंटरतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती प्रतीक खरमाटे याने आपल्या यशाचे रहस्य उलगडले. इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत कोटा एक्सलन्स सेंटरमध्येच शिक्षण घेत असल्याचे सांगून तो म्हणाला, “नियमित फाउंडेशन क्लास, दर आठवड्याला होणाऱ्या चाचणी परीक्षा आणि शंका निरसनासाठी असणारे डाऊट सेशन्स यामुळे माझा पाया अत्यंत भक्कम झाला.” यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्याने अभ्यासाचे योग्य वेळापत्रक, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले.
तसेच अल्फिया शेख हिचे वडील शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोटा एक्सलन्स सेंटरच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच अल्फियाचा ‘एमबीबीएस’चा मार्ग सुकर झाला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास व सातत्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विद्याधर काकडे, विश्वस्त व मार्गदर्शिका हर्षदा काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे, विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण बिटाळ, माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख वंदना पुजारी व सर्व शिक्षकवृंदांनी कौतुक करत अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काटे मॅडम यांनी केले.

COMMENTS