Homeताज्या बातम्या

जंतर मंतरवरील ‘CJP’ आंदोलनावर रामदेव बाबांची टीका; संजय राऊतांचा घणाघात, आठवून दिली २०११ ची ती घटना!

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर मंतरवर 'कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजेपी) यूजी-नीट (UG-NEET) पेपरफुटीविरोधात उभारलेल्या ३५ दिवसांच्या आंदोलनानंतर केंद्र

एस.के.एच. वैद्यकीय महाविद्यालयात अजितदादा पवार यांची जयंती साजरी; प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
देवळाली प्रवरा जिल्हा बँकेतील रोखपालच्या बदलीची मागणी; ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक दिल्यास शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा
वाहनांच्या काचा फोडून ऐवज अन् महत्त्वाची कागदपत्रे लंपास; अहिल्यानगरमधील दिल्लीगेट व पत्रकार चौक परिसरातील घटना
Ramdev slams 'Azadi' slogans against Brahminism, RSS; criticises Gen Z  protest at Jantar Mantar | Dehradun News - The Times of India

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर मंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) यूजी-नीट (UG-NEET) पेपरफुटीविरोधात उभारलेल्या ३५ दिवसांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. या आंदोलनाला यश आले असले, तरी सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही या आंदोलनावर निशाणा साधला आहे. जेन झी (Gen-Z) च्या या आंदोलनामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाल्याचा अजब दावा बाबा रामदेव यांनी केला. या दाव्यानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी रामदेव बाबांवर जोरदार पलटवार करत २०११ मधील आंदोलनाची आठवण करून दिली.

बाबा रामदेव काय म्हणाले?

“Gen Z ने भारताला बदनाम केले आहे. शिव्यांची लाखोली वाहणे ही आपली संस्कृती आणि नैसर्गिक स्वभाव नाही. आपण नेहमी वयाने मोठ्या व्यक्तींचा, आई-वडील आणि गुरूंचा आदर केला आहे. रस्त्यांवर उतरून देश चालत नसतो; देश संसदेतून आणि संविधानाच्या आधारे चालतो. देशाचा शिक्षण मंत्री कोण असेल किंवा नसेल हे रस्त्यावर ठरवता येत नाही, तर ते संसद आणि देशाचे पंतप्रधान ठरवतील,” अशी कडक टीका बाबा रामदेव यांनी केली.

संजय राऊतांचे खरमरीत प्रत्युत्तर; ‘ती’ घटना काढली बाहेर

बाबा रामदेव यांच्या विधानावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत उत्तर दिले. २०११ मध्ये लोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवर उभारलेल्या आंदोलनाची आठवण करून देत राऊत म्हणाले, “आंदोलनस्थळावरून पोलीस कारवाईदरम्यान महिलांचे कपडे घालून कोण पळून गेले होते? तो कोणाचा अपमान होता? तुम्हीसुद्धा तेव्हा आंदोलनाला बसले होते ना, मग का बसले होते ते आधी जनतेला सांगा. तुम्ही आंदोलन केले तेव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का?”

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “रामदेव बाबा हे व्यापारी आहेत. उद्या देशात काँग्रेस आणि आमचे सरकार आले, की हेच रामदेव बाबा राहुल गांधींचा सन्मान करताना दिसतील.”

दरम्यान, २०११ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करत असताना पोलीस कारवाईदरम्यान बाबा रामदेव यांनी सलवार-कुर्ता परिधान करून निसटण्याचा प्रयत्न केला होता, या ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख करत राऊतांनी रामदेव बाबांचा चांगलाच समाचार घेतला.

COMMENTS