माजलगाव : सिरसाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या बाललैंगिक अत्याचार व छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपी अभय शिवाजी कदम यांची सबळ पुराव्याअभावी मा.

माजलगाव : सिरसाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या बाललैंगिक अत्याचार व छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपी अभय शिवाजी कदम यांची सबळ पुराव्याअभावी मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, माजलगाव यांनी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अभय शिवाजी कदम हा फिर्यादी शाळेत जात असताना ऑटो स्टँड परिसरात तिच्याकडे वारंवार पाहत असे, खुणा करून मोबाईल क्रमांक मागण्याचा प्रयत्न करत असे. तसेच, २९ जुलै २०२३ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तिच्या चुलत बहिणीसोबत घरासमोर बसली असताना आरोपी तेथे येऊन मोबाईल क्रमांक मागण्याबाबत इशारे करून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ तेथे आल्यानंतर त्याने आरोपीस समज देऊन तेथून पाठवून दिल्याचेही तक्रारीत नमूद होते.
या तक्रारीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेचे कलम ३५४(डी) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) २०१२ मधील कलम ११ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, माजलगाव येथे दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र, आरोपीविरुद्धचे आरोप संशयातीतपणे सिद्ध करणारा ठोस व विश्वासार्ह पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात सरकार पक्षाला यश आले नाही. त्यामुळे उपलब्ध पुरावे आणि साक्षींचा विचार करून मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपी अभय शिवाजी कदम यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. व्ही. बी. लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. आर. के. गवते व अॅड. एस. बी. कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. एन. आर. जावळे यांनी सहकार्य केले.

COMMENTS